अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर ह्यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन. येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा. ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांला कळवा; प्रथम घडणार्या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणार्या गोष्टी आम्हांला ऐकवा. पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू; तुम्ही बरेवाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन1 त्याकडे पाहू. पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय. मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील. आम्हांला समजावे म्हणून हे प्रारंभापासून कोणी प्रकट केले? “तो न्यायी आहे” असे आम्ही म्हणावे म्हणून पूर्वकालापासून कोणी सांगितले? हे कोणीच कळवले नाही; कोणी हे ऐकवले नाही; कोणी तुमचे शब्द ऐकले नाहीत. मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.” मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही. पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.
यशया 41 वाचा
ऐका यशया 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 41:19-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ