YouVersion लोगो
सर्च आयकॉन

होशेय 2:14-23

होशेय 2:14-23 MARVBSI

ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस. कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन. मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल; पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील. मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”