YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 8:7-13

इब्री 8:7-13 MARVBSI

कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो, “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला, आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला, शिकवणार नाही. कारण त्यांतील लहानांपासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील; कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.” त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.