YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 12:5-11

इब्री 12:5-11 MARVBSI

आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस; कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते; पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.