YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:8-12

इब्री 11:8-12 MARVBSI

अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’ परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्‍यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्‍यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली.