YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 1:4-14

इब्री 1:4-14 MARVBSI

ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे”? आणि पुन्हा, “मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल”? आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, “देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.” आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, “तो आपले देवदूत वायू, आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.” पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” आणि, “हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; तू त्यांना झग्यासारखे - वस्त्रासारखे गुंडाळशील, आणि ती बदलली जातील; परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.” पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, “मी तुझ्या वैर्‍यांना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस”? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?