YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 9:8-17

उत्पत्ती 9:8-17 MARVBSI

देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, “पाहा, मी तुमच्याशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो; त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो. तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत, आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही.” देव म्हणाला, “माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असणार्‍या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या, युगानुयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे : मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल, तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्‍या कराराचे मला स्मरण होईल.” देव नोहाला म्हणाला, “माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय.”