YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 50:22-26

उत्पत्ती 50:22-26 MARVBSI

योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला. योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.” मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.” योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.