योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले. आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.” त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी : तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.
उत्पत्ती 50 वाचा
ऐका उत्पत्ती 50
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 50:14-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ