इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.” मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. मग त्या दोघांना एफ्राइमास आपल्या उजव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला; त्याने आपले हात उजवेडावे केले; मनश्शे तर ज्येष्ठ होता. त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले, ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”
उत्पत्ती 48 वाचा
ऐका उत्पत्ती 48
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 48:11-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ