YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 46:1-7

उत्पत्ती 46:1-7 MARVBSI

तेव्हा इस्राएल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला; तेथे त्याने आपला पिता इसहाक ह्याच्या देवाला यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?” तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.” मग याकोब बैर-शेबाहून निघाला, आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यांत इस्राएलाच्या मुलांनी आपला पिता याकोब आणि आपली बायकामुले बसवून नेली. ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळवलेले धन घेऊन मिसर देशात आले; ह्याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिसर देशात आली; त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे सर्व संतती मिसरात आणली.