तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, “सर्व लोकांना बाहेर घालवा.” योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे काय?” त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्यापुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच. तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले. ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही. देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे.
उत्पत्ती 45 वाचा
ऐका उत्पत्ती 45
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 45:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ