ह्याप्रमाणे इस्राएलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले; कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की, “तुम्ही कोठून आलात?” त्यांनी म्हटले, “कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत.”
उत्पत्ती 42 वाचा
ऐका उत्पत्ती 42
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 42:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ