योसेफ त्याला म्हणाला, “ह्याचा अर्थ असा : ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस; तीन दिवसांच्या आत फारो तुझे शीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्ववत नेमील आणि तू पूर्वीप्रमाणेच फारोचा प्यालेबरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून ह्या घरातून माझी सुटका कर. कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे; आणि येथेही ह्या बंदिखान्यात टाकण्याजोगे मी काहीएक केलेले नाही.” स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफाला म्हणाला, “मलाही असे स्वप्न पडले की, पांढर्या रोट्यांच्या तीन टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या, आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वान्ने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते.” योसेफाने उत्तर दिले, “ह्याचा अर्थ असा : त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस; फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.” तिसर्या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांना मेजवानी दिली, आणि त्याने आपल्या प्यालेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक ह्यांना पुढे आणले. त्याने प्यालेबरदारांच्या नायकाला त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमले, आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला; पण त्याने आचार्यांच्या नायकाला फाशी दिली. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.
उत्पत्ती 40 वाचा
ऐका उत्पत्ती 40
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 40:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ