तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला. तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?” तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.” तो मनुष्य म्हणाला, “ते येथून निघून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला आणि ते त्याला दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!” हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला
उत्पत्ती 37 वाचा
ऐका उत्पत्ती 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 37:14-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ