YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 36:1-19

उत्पत्ती 36:1-19 MARVBSI

एसाव म्हणजे अदोम ह्याची वंशावळ : एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा, आणि इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण बासमाथ ह्या बायका त्याने केल्या. एसावापासून आदेला अलीपाज व बासमाथेला रगुवेल हे मुलगे झाले; आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले, मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे, आणि कनान देशात मिळवलेले धन हे सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला. कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की, त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती; तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्या-मुळे ज्या देशात ते उपरे होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना. म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ : एसावाच्या मुलांची नावे ही : एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलीपाज आणि एसावाची बायको बासमाथ हिचा मुलगा रगुवेल. अलीपाज ह्याचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम आणि कनाज हे होते. एसावाचा मुलगा अलीपाज ह्याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश. रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश. सिबोनाची मुलगी1 अना, ह्याची कन्या अहलीबामा जी एसावाची बायको तिच्यापासून एसावाला यऊश, यालाम व कोरह हे मुलगे झाले. एसाव वंशांतले सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज, सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक; अदोम देशात अलीपाज ह्याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे. एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे : सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे. एसावाची बायको अहलीबामा, हिचे मुलगे हे : सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह; हे सरदार एसावाची बायको अहलीबामा, अनाची मुलगी, हिला झाले. एसाव म्हणजे अदोम ह्याचा हा वंश, व हे त्यांचे सरदार.