याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दीना एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली. तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “मला ही मुलगी बायको करून द्या.” त्याने आपली कन्या दीना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले. हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की, “माझा मुलगा शखेम ह्याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे तर ती त्याला बायको करून द्या. तुम्ही आमच्याशी सोयरीक करा; तुमच्या मुली आम्हांला द्या व आमच्या मुली तुम्ही करा. आमच्यात वस्ती करून राहा; हा देश तुम्हांला खुला आहे; त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा.” शखेम दीनेच्या बापाला व भावांना म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन. वाटेल तो मोबदला व आंदण माझ्यापाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन; तेवढी मुलगी मला बायको करून द्या.”
उत्पत्ती 34 वाचा
ऐका उत्पत्ती 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 34:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ