YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 33:1-4

उत्पत्ती 33:1-4 MARVBSI

ह्यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले तर एसाव चारशे माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले; तेव्हा त्याने लेआ व राहेल आणि त्या दोन दासी ह्यांच्याकडे आपापली मुले दिली. त्याने दासी व त्यांची मुले सर्वांत पुढे, त्यांच्यानंतर लेआ व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ ह्यांना ठेवले. तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.