YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:22-31

उत्पत्ती 32:22-31 MARVBSI

मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले ह्यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यांना नदीपलीकडे उतरवून लावले, आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली. मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.” त्याने मग त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो म्हणाला, “याकोब.” त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.” मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.” तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला