गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात गेला असता त्याला पुत्रदात्रीची फळे मिळाली, ती त्याने आपली आई लेआ हिला नेऊन दिली; तेव्हा राहेल लेआ हिला म्हणाली, “पुत्रदात्रीची फळे तुझ्या मुलाने आणली आहेत त्यांतली काही मला दे.” तेव्हा ती तिला म्हणाली, “माझा नवरा तू घेतलास हे काय थोडे झाले म्हणून तू माझ्या मुलाने आणलेली फळेही घेऊ पाहतेस?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला म्हणून नवरा आज रात्री तुझ्यापाशी निजेल.” संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला तेव्हा लेआ त्याला सामोरी जाऊन म्हणाली, “आपण माझ्यापाशी या; माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फळे देऊन मी आपणाला खरोखर भाड्याने घेतले आहे.” तेव्हा त्या रात्री तो तिच्यापाशी निजला. देवाने लेआचे गार्हाणे ऐकले, आणि ती गर्भवती होऊन याकोबापासून तिला पाचवा मुलगा झाला. लेआ म्हणाली, “मी आपली दासी माझ्या नवर्याला दिली म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘इस्साखार’ ठेवले. याकोबापासून लेआ पुन: गर्भवती होऊन तिला सहावा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, “देवाने मला चांगले आंदण दिले आहे; ह्या खेपेस माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी सहा मुलगे झाले आहेत;” म्हणून तिने त्याचे नाव ‘जबुलून’ ठेवले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने ‘दीना’ ठेवले.
उत्पत्ती 30 वाचा
ऐका उत्पत्ती 30
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 30:14-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ