YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 28:12-15

उत्पत्ती 28:12-15 MARVBSI

तेव्हा त्याला स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत. आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन; तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”