YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 27:19-24

उत्पत्ती 27:19-24 MARVBSI

तेव्हा याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी एसाव, आपला वडील मुलगा आहे; आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे; तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे एवढे खा; आणि आपण मला आशीर्वाद द्यावा.” तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?” तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले.” मग इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे.” तेव्हा याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळ गेला; तो त्याला चाचपून म्हणाला, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” त्याचे हात त्याचा भाऊ एसाव ह्याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्याला म्हणाला, “तू माझा मुलगा एसावच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.”