एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकूनभागून आला. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले. याकोब त्याला म्हणाला; “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.” एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला.
उत्पत्ती 25 वाचा
ऐका उत्पत्ती 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 25:29-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ