आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर. पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.” त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधू नाहोर ह्याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल ह्याला झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.” ती म्हणाली, “प्या, बाबा;” आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरवून घेऊन त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.”
उत्पत्ती 24 वाचा
ऐका उत्पत्ती 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 24:12-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ