म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस; ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.” मग अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याच्याबरोबर बैर-शेबा येथे गेले; आणि अब्राहाम बैर-शेबा येथे राहिला.
उत्पत्ती 22 वाचा
ऐका उत्पत्ती 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 22:14-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ