परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या. पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात. दुसर्या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. तिसर्या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले.
उत्पत्ती 2 वाचा
ऐका उत्पत्ती 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 2:8-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ