परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज्ज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता, आणि जमिनीची मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता; मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.
उत्पत्ती 2 वाचा
ऐका उत्पत्ती 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 2:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ