YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:15-25

उत्पत्ती 2:15-25 MARVBSI

परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी व सर्व वनपशू, ह्यांना नावे दिली; पण आदामाला कोणी अनुरूप साहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली; परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.” ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती; तरी त्यांना संकोच वाटत नसे.