YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 17:1-8

उत्पत्ती 17:1-8 MARVBSI

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा. तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.” तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला : “पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अति फलसंपन्न करीन; तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”