ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.” अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.” अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.” तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.” मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.” अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला. तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.” तो म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?” त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.” त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन-दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली, तेव्हा त्यांना अब्रामाने हाकून दिले.
उत्पत्ती 15 वाचा
ऐका उत्पत्ती 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 15:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ