YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 11:1-9

उत्पत्ती 11:1-9 MARVBSI

सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले, आणि तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करून पक्क्या भाजू.” त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.” तेव्हा मानवपुत्र नगर व बुरूज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे, ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.” नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव ‘बाबेल’ असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.