मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.” देव म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो; ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी ह्यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो.” आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.
उत्पत्ती 1 वाचा
ऐका उत्पत्ती 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 1:26-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ