YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 1:14-25

उत्पत्ती 1:14-25 MARVBSI

मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्‍या होवोत; पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस. मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.” प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस. मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.