पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुंता करून घेणार्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’ जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात. कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
गलतीकरांस पत्र 5 वाचा
ऐका गलतीकरांस पत्र 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलतीकरांस पत्र 5:2-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ