पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे; परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?” आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही; तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’ ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.
गलतीकरांस पत्र 2 वाचा
ऐका गलतीकरांस पत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलतीकरांस पत्र 2:11-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ