YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 5:5-9

यहेज्केल 5:5-9 MARVBSI

प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, ही यरुशलेम; ही राष्ट्रांमध्ये स्थापली आहे व हिच्याभोवती देश वसवले आहेत. तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत. ह्यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा अधिक बंडाळी माजवली व माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय पाळले नाहीत, आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणेदेखील वागला नाहीत, त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी, मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रांदेखत तुझ्यामध्ये न्यायशासन करीन. तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे, आजवर मी केले नाही व पुन्हा त्याप्रमाणे करणार नाही, असे मी तुझ्या ठायी करीन.