हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्यासमोर मांड; तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ. तिला वेढा पडला आहे, तिच्यासमोर बुरूज रचून मोर्चे बांधले आहेत, तिच्यापुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहेत, असे चित्र काढ. मग तू एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तू आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तू तिला वेढा घालणारा हो. हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल. आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्राएल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव; जितके दिवस तू त्या कुशीवर निजून राहशील, तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत राहा. कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षांइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणले आहेत; तीनशे नव्वद दिवस तुला इस्राएल घराण्याचा भार वाहायचा आहे. पुन्हा ते दिवस संपल्यावर तू उजव्या कुशीवर नीज व चाळीस दिवस यहूदा घराण्याच्या अधर्माचा भार वाहा; प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी मी एक दिवस धरला आहे. तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्याविरुद्ध संदेश दे. पाहा, मी तुला बंधनांनी बांधतो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत ह्या कुशीचा त्या कुशीला वळायचा नाहीस.
यहेज्केल 4 वाचा
ऐका यहेज्केल 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 4:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ