पुन्हा सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांना टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला मी मिसराचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटील; त्याने हरण केलेले तो हरण करील, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल. त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मी त्याला मिसराचा मुलूख देईन, कारण हे श्रम त्यांनी माझ्यासाठी केले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. त्या दिवशी इस्राएल घराण्यास एक शृंग उगवेल असे मी करीन व त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेल असे करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
यहेज्केल 29 वाचा
ऐका यहेज्केल 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 29:17-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ