YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 28:11-14

यहेज्केल 28:11-14 MARVBSI

पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस; तू ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर आहेस. देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास; मी तुझी तशी योजना केली होती; तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास; तू अग्नीप्रमाणे झगझगणार्‍या पाषाणांतून हिंडत असायचास.