जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल. तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व न्यायाने वागला तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना? तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, ऐक; माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय? कोणी नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो. दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन न्यायाने व नीतिमत्तेने वागेल तर तो आपला जीव वाचवील. तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही. तथापि इस्राएल घराणे म्हणते, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, माझे मार्ग न्याय्य नाहीत काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत असे नव्हे काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.
यहेज्केल 18 वाचा
ऐका यहेज्केल 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 18:20-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ