YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 7:1-7

निर्गम 7:1-7 MARVBSI

मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, तुला मी फारोचा देव करतो, आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल; तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की, तू इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ दे. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन. आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.” मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. मोशे व अहरोन ह्यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता. अहरोनाची काठी