मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.” मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, मिसर देशात परत जा; कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत.” मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरास परत जाशील तेव्हा पाहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारोपुढे करून दाखव; तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही. तू जाऊन फारोला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, इस्राएल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’ मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारायला पाहिले. तेव्हा सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांजवळ ठेवून ती म्हणाली, “तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस.” तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुंतेला अनुलक्षून म्हटले.
निर्गम 4 वाचा
ऐका निर्गम 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 4:18-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ