मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलावले; तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही सीनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले; पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे; मग जी काही आज्ञा त्याला होई ती तो बाहेर येऊन इस्राएल लोकांना सांगत असे. इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.
निर्गम 34 वाचा
ऐका निर्गम 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 34:29-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ