मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील. जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात. म्हणजे दर्शनमंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक, कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे.” कराराची खूण म्हणून पाळायचा शब्बाथ दिवस
निर्गम 31 वाचा
ऐका निर्गम 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 31:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ