YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 23:9-12

निर्गम 23:9-12 MARVBSI

उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर, आणि तिचे उत्पन्न साठव. पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर. सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि तुझे गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरा ह्यांचा जीव ताजातवाना होईल.