कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गार्हाणे केले, तर मी त्यांचे गार्हाणे अवश्य ऐकेन; आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील. तुझ्याजवळ राहणार्या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले, तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नकोस, व त्याच्यापासून व्याज घेऊ नकोस. तू आपल्या शेजार्याचे पांघरूण गहाण ठेवून घेतलेस, तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे; कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार; ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गार्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
निर्गम 22 वाचा
ऐका निर्गम 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 22:22-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ