फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले; इस्राएल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्राएल लोकांकडून शपथ वाहवून त्यांना सांगितले होते की, देव खात्रीने तुम्हांला भेट देईल तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या अस्थी घेऊन जा. मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.
निर्गम 13 वाचा
ऐका निर्गम 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 13:17-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ