YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 12:21-23

निर्गम 12:21-23 MARVBSI

मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा. नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.