मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी. मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.” मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे. तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन; ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील; तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला. फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?” तेव्हा मोशे आणि अहरोन ह्यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा; पण कोणकोण जाणार?” मोशेने म्हटले, “आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे. असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील.” मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही.
निर्गम 10 वाचा
ऐका निर्गम 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 10:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ