YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 5:1-3

एस्तेर 5:1-3 MARVBSI

तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला. राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”